Purandat | समर्थ ज्ञानपीठ संचलित पुरंदर पब्लिक स्कूल, जेजुरीचे कराटेमध्ये घवघवीत यश


पुरंदर रिपोर्टर लाईव्ह.  

जेजुरी (प्रतिनिधी)

                     नेहमीच विविध क्षेत्रांत अग्रेसर ठरलेल्या पुरंदर पब्लिक स्कूल, जेजुरी ने यंदाही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. समर्थ ज्ञानपीठाचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर भाविक व कराटे प्रशिक्षक शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित पुरंदर तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा २०२५-२६ मध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल केले.



ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर पब्लिक स्कूल, जेजुरी येथे झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्तंड देवस्थान जेजुरीचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, संदीप वाकचौरे (खजिनदार, कराटे-डॉ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व अध्यक्ष, स्पोर्ट्स कराटे-डॉ असोसिएशन पुणे) आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांचा शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर भाविक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनवणे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षिका श्रद्धा पवार यांनी केले.


स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी तब्बल ८ सुवर्ण, २ रौप्य व २ कांस्य पदकं मिळवत कराटेत वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे गोल्ड मेडल प्राप्त सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, मुख्याध्यापक चंद्रशेखर भाविक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 विजेत्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे —

👉 मुले (गोल्ड मेडल विजेते)


१. राम जितेंद्र मिसाळ – इ. ९ वी

२. सोनू शिवकुमार कवरेती – इ. ९ वी

३. सोहम सचिन काळाने – इ. ९ वी

४. तनुज भूपेंद्र सिंग – इ. ७ वी

५. ऋषिकेश सूर्यकांत साळुंखे – इ. ६ वी

६. सत्यम केविन सस्ते – इ. ७ वी

७. नैतिक भूपेंद्र सिंग – इ. १० वी

👉 मुली

जान्हवी सूर्यकांत साळुंखे – गोल्ड मेडल, इ. १० वी

पूर्वा हनुमंत पवार – सिल्वर मेडल, इ. ८ वी

सोनम शिवकुमार कवरेती – ब्रॉन्झ मेडल, इ. ७ वी

आयेशा शबाना मुल्ला – ब्रॉन्झ मेडल, इ. ६ वी

नंदिनी राजू पवार – सिल्वर मेडल, इ. ९ वी

Post a Comment

0 Comments